लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लवकरच कोरोनाची दुसरी लाट युरोपला विळख्यात घेईल, असा गंभीर इशारा दिला आहे. युरोपच्या काही भागांमध्ये या दुसऱया लाटेची चिन्हे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटनमधल्या अनेक संस्थांनी हा इशारा पूर्वीच दिला आहे. स्पेनहून आलेल्या प्रवाशांवर चौदा दिवसांच्या विलगीकरणाची सक्ती आहे. हेच कठोर उपाय अन्य देशातून येणाऱया प्रवाशांसाठीही शक्य आहेत.
गुगलचे नवे निर्बंध
वॉशिंग्टन : सर्वात मोठी महाजाल कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकास्थित गुगलने कर्मचाऱयांसाठी नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार जुलै 2021 पर्यंत बव्हंशी सर्व कर्मचाऱयांना घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे. केवळ कामाची अनिवार्यता असणाऱयांना कार्यालयात बोलाविण्यात येत आहे. गुगलच्या सहकंपन्यांसाठीही हाच नियम लागू करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वीच गुगलने कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची मुभा होती.