ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 18 हजार 177 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 217 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 03 लाख 23 हजार 965 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 49 हजार 435 एवढी आहे.
शनिवारी 20,923 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 2 लाख 47 हजार 220 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 99 लाख 27 हजार 310 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 17 कोटी 48 लाख 99 हजार 783 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 09 लाख 58 हजार 125 कोरोना चाचण्या शनिवारी(दि.02) करण्यात आल्या.