- सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाखांच्या उंबरठ्यावर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. गेल्या 5 महिन्यात पहिल्यांदाच गुरुवारी सकाळी कोरोनाचे 53 हजारपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. तर 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 53,476 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 17 लाख 87 हजार 534 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 60 हजार 692 एवढी आहे. आतापर्यंत 5 कोटी 31 लाख 45 हजार 709 जणांना लस देण्यात आली आहे.
बुधवारी दिवसभरात 26,490 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 03 लाख 95 हजार 192 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 31 हजार 650 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. 94 % वरून 88% वर आले आहे. ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
आतापर्यंत देशात 23 कोटी 75 लाख 03 हजार 882 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 65 हजार 021 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 24 मार्च 2021) एका दिवसात करण्यात आल्या.