वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लॉकडाऊनमधील काळात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन आपल्या चाहत्यांसाठी आपल्या दैनंदिनीतील काही मजेदार व्हिडिओ शेअर करत असतो आणि यूजर्सनाही ते पसंतीला उतरत असतात. शनिवारी शिखरने त्याचा मुलगा जोरावर याच्यासह 1996 मधील ‘चाहत’ या चित्रपटाच्या ‘डॅडी कूल’ गाण्यावर डान्स करतानाचा व्हीडिओ पोस्ट केला. यात दोघांनी एकसारखा पोशाख घातला आहे आणि त्यांच्या या डान्सने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘या मस्तीखोर जोरावरसोबत आयुष्य खूप मजेदार आहे, असे धवनने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले.