तिघा जणांना अटक, तिघे जण फरारी : कॅम्प पोलिस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
धोबीघाटजवळील एका जुगारी अड्डय़ावर कॅम्प पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईच्यावेळी तिघा जणांना अटक करण्यात आली असून आणखी तिघे जण पोलिसांनी चकवून फरारी झाले आहेत. सर्व सहा जणांवर येथील कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस. एन. बस्टा, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. बी. डोळ्ळी, एम. वाय. हुक्केरी, आर. एस. पुजेरी, बी. बी. गौडर, के. एम. बनोशी, एम. ए. पाटील, आर. एम. कांबळे, बी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, व्ही. एफ. कलखांबकर, एस. एच. तळवार आदींनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी इम्रान मेहबूबअली शेख ऊर्फ पंछी (वय 39) रा. चर्च स्ट्रीट, कॅम्प, इम्रान नबीसाब शेख (वय 30) रा. हायस्ट्रीट कॅम्प, फईम बाबु बेपारी (वय 22) रा. बुचर स्ट्रीट कॅम्प अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 4 हजार 725 रुपये रोख रक्कम, तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिब्रान सलाउद्दीन बेपारी, कसाई गल्ली कॅम्प, मेहबूब ऊर्फ घोरी अबेदुल्ला बेपारी रा. कोंडाप्पा स्ट्रीट कॅम्प, समीर गौस बेटगेरी रा. बिस्ती गल्ली कॅम्प हे तिघे जण फरारी झाले आहेत. या सर्व सहा जणांवर कर्नाटक पोलीस कायद्याबरोबरच संसर्गजन्य रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.