कोरोना बाधित एकूण संख्या 1408
कोरोना मुक्त एकूण रुग्ण 796
कोरोना सक्रिय एकूण संख्या 589
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये बुधवारी 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना बुधवारी दिलासादायक बातमी म्हणजे तब्बल 71 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ामध्ये गेल्या महिनाभरापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून बुधवारी आणखी 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 1408 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्याही वाढून 796 पर्यंत गेली आहे. आतापर्यंत 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्हय़ात कोरोना सक्रिय 589 रुग्ण आहेत. जिल्हय़ात कंटेनमेंट झोनमध्येही वाढ झाली असून 27 कंटेनमेंट झोन वाढल्याने एकूण 248 कंटेनमेंट झोन झाले आहेत.
कोरोना बाधित नव्याने 50 रुग्ण
जिल्हय़ात बुधवारी नव्याने 50 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये कुडाळ तालुक्यातील कुडाळ तीन, पावशी एक, कुडाळमधील कुडाळ-कुंभारवाडी सात, कुडाळ-ग्रामीण रुग्णालय दोन, माणगाव तर्पे तुळसुली एक. मालवण तालुक्यात मालवण-भरड तीन, कोळंब एक, आचरा एक, कांदळगाव एक. सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी एक, माडखोल एक, माजगाव एक, कारिवडे एक, आंबोली तीन. देवगड तालुक्यात देवगड दोन, जामसंडे चार. दोडामार्ग तालुक्यात दोडामार्ग सहा, भेडशी एक, पाटये पुनर्वसन एक, कोनाळकट्टा एक. कणकवली तालुक्यात कणकवली एक, कासार्डे दोन, फोंडा दोन, वागदे एक. वेंगुर्ले तालुक्यात म्हापण एक. वैभववाडी तालुक्यात नाधवडे एक.
रेल्वेने 3115 आले प्रवासी
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 2 मे 2020 पासून आतापर्यंत 2 लाख 8 हजार 914 व्यक्ती जिल्हय़ात वेगवेगळय़ा वाहनांद्वारे आले आहेत. यामध्ये गणेश उत्सवासाठी 1 ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास 45 हजार व्यक्ती आल्या आहेत. गणेशोत्सवासाठी गणपती स्पेशल रेल्वे सोडूनसुद्धा रेल्वेने येणाऱयांची संख्या मात्र अत्यल्प होती. आतापर्यंत रेल्वेने 3115 व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 14524
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1408
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 12900
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 216
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 589
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 23
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 796
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 9901
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 11286
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 208914
रेल्वेने दाखल झालेले प्रवासी 3115
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 115