ऑनलाईन टीम / नागपूर :
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
लॉकडाऊनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरता येणार नाही.
याशिवाय लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आजपासून कडक लॉकडाऊनचे निर्देश दिले असले तरी, आज सकाळी नागपूरवासी मोठ्या प्रमाणात मॉर्निग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी नियमांची पायमल्ली केली जात होती.