विवाहाच्या 7 वर्षांनी कान्ये वेस्टपासून विभक्त, 4 मुलांचा ताबा देण्याची केली मागणी
हॉलिवूड स्टार किम कार्दशियनने पती तसेच अमेरिकेन रॅपर कान्ये वेस्टशी झालेल्या विवाहाच्या 7 वर्षांनी घटस्फोटाचा अर्ज केला आहे. किमने न्यायालयात घटस्फोटाच्या अर्जासह चार मुलांच्या जॉइंट लीगल अँड फिजिकिल कस्टडीची मागणीही केली आहे.
किमने वेस्टपासून घटस्फोट घेण्यासाठी लॉस एंजिलिसमधील प्रख्यात वकील लॉरा वासर यांची मदत घेतली आहे. किम आणि कान्ये वेगवेगळे राहत होते. दोघेही विवाह समुपदेकाकडेही जात होते.
मुलांसोबत लॉस एंजिलिसमध्ये
40 वर्षीय किम दीर्घकाळापासून लॉस एंजिलिसमध्ये स्वतःच्या 4 मुलांसह राहत आहे. तर 43 वर्षीय कान्ये वेस्ट हा व्योमिंगमध्ये स्वतःच्या फार्महाउसवर राहत आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांनाही वेडिंग रिंगशिवाय पाहिले गेले होते.
किमचा तिसरा घटस्फोट
किमने स्वतःचे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. स्वतःच्या कारकीर्दीवर लक्ष केंदीत करू इच्छित असल्याचे तिने कान्येला सांगितले होते. दोघांचाही घटस्फोट झाल्यास किमचा हा डेमन थॉमस आणि ख्रिस हम्फ्रीजनंतरचा तिसरा घटस्फोट असणार आहे.
2014 मध्ये विवाह
किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये इटलीत विवाह केला होता, दोघांनाही चार अपत्य आहेत. मोठय़ा मुलीचे नाव नॉर्थ, मोठय़ा मुलाचे नाव सँट, छोटय़ा मुलीचे नाव शिकागो तर मुलाचे नाव साम आहे.
वकील व्हायची इच्छा किम स्वतःची बार एक्झाम आणि वकील होण्याच्या इच्छेबद्दल अत्यंत गंभीर आहे. किम स्वतःच्या तुरुंग सुधार मोहिमेसंबंधीही गांभीर्याने विचार करत आहे.