प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाकडून कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. एकूण 2782 कर्मचाऱयांना ही लस आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. हुबळीसह वास्को-द-गामा, कॅसलरॉक, बेळगाव, अळणावर, गदग, होस्पेट, बळ्ळारी, बागलकोट, विजापूर येथील कर्मचाऱयांना हुबळी येथील कार्यालयात लस देण्यात आली. यामध्ये 2019 आरोग्य कर्मचारी, 568 आरपीएफ जवान, 1726 रेल्वे कर्मचारी तर 269 इतर कर्मचाऱयांना लसीकरण करण्यात आले.