वृत्तसंस्था /ऑकलंड
कोरोना महामारीमुळे 2021 सालातील भारतात आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीत थांबवावी लागली होती. आता या स्पर्धेतील उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविले जाणार आहेत.दरम्यान या स्पर्धेत न्यूझीलंडच्या खेळाडूंना खेळण्यासाठी या देशाच्या क्रिकेट मंडळाने अधिकृत परवानगी दिली आहे.
दरम्यान आगामी उपखंडीय दौऱयांसाठी आणि आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या विविध संघांची घोषणा करण्यात आली. केन विल्यम्सनकडे न्यूझीलंडचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱयावर येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंडचा संघ बांगलादेश आणि पाकचा दौरा करणार आहे. या दौऱयासाठी न्यूझीलंडच्या दुय्यम संघाचे नेतृत्व लॅथमकडे सोपविण्यात आले आहे.
न्यूझीलंडचा संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकचा दौरा करणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडचा संघ बांगलादेशला रवाना होणार आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघ- विल्यम्सन (कर्णधार), ऍसल, बोल्ट, चॅपमन, कॉनवे, फर्ग्युसन, ग्युप्टील, जेमिसन, मिचेल, नीशम, फिलीप्स, सँटनर, सिफर्ट, सोधी, साऊदी आणि मिल्ने.
बांगलादेश, पाक दौऱयासाठी न्यूझीलंड वनडे संघ- लॅथम (कर्णधार), ऍलेन, बेनेट, ब्लंडेल, ब्रेसवेल, ग्रॅण्डहोम, डफी, हेन्री, कुगेलजेन, मॅककॉन्चे, निकोल्स, एजाझ पटेल, रचिन रविंद्र, सीयर्स, ब्लेअर टिकनर आणि यंग.
पाक दौऱयातील टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ- लॅथम (कर्णधार), ऍलेन, ऍसल, बेनेट, ब्लंडेल, चॅपमन, ग्रॅण्डहोम, ग्युप्टील, हेन्री, मिचेल, एजाझ पटेल, सोधी, सीयर्स, टिकनर आणि यंग.