ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातच मंगळवारी पंजाबमध्ये सहा जणांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात मृतांची एकूण संख्या 73 झाली आहे. तर मागील चोवीस तासात 104 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 3371 झाली आहे.
काल राज्यात झालेल्या 6 मृत्यांमध्ये अमृतसरमध्ये 3, जालंधर, लुधियाना आणि फिरोजपुरमध्ये प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आता पर्यंत 1 लाख 98 हजार 211 रुग्णांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर राज्यातील विविध रुग्णालयात 383 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तर राज्यात मंगळवारी 18 रुग्णांची प्रकृती सुधारली असून यामध्ये मोहाली मधील 10, पठाणकोट आणि नवांशहर मधील प्रत्येकी 3, पटियाला व फाजिल्कामधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याच बरोबर राज्यात आतापर्यंत 2461 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेेेत.