नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी देशातील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱया कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर उपस्थित राहणार आहेत. शेतकऱयांच्या कल्याणासाठी सरकारकडून घेण्यात आलेल्या विविध सुधारणांवर शेतकरी स्वतःचे अनुभव मांडणार आहेत. याचवेळी ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जाहीर करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नऊ कोटी लाभार्थी शेतकऱयांना 18 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम पाठविण्यास परवानगी देतील. यावेळी 6 राज्यांतील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत.
Trending
- +923130624785 पाकिस्तानी नंबरपासून जनतेने सावध रहावे
- सांडपाणी जोडणी नसल्याने मडगावात हॉटेल्सवर कारवाई
- आयसीसी टी-20 विश्वचषक धमाका
- लोकायुक्तांची धडक… मनपा अधिकाऱ्यांना धडकी
- हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला मिळणार गती
- गणेबैल टोल नाक्यावर काँग्रेसचा रास्ता रोको
- 15 जूनपासून एक्स्प्रेस धावणार विद्युत इंजिनवर
- उचगाव जागृत मळेकरणी देवस्थान यात्रेवर बंदीचा ऐतिहासिक निर्णय