कपिलेश्वर उड्डाण पुलावरील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
गळय़ात मांजा अडकून एक मोटारसायकलस्वार युवक जखमी झाला. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाण पुलावर ही घटना घडली. जखमी युवकावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत.
यल्लाप्पा भीमाप्पा चतूर (वय 30) रा. यरमाळ असे जखमीचे नाव आहे. कपिलेश्वर उड्डाण पुलावरून मोटारसायकलवरून जाताना मांजा त्यांच्या गळय़ाला अडकला. त्यामुळे ते मोटारसायकलवरून खाली पडले. वेग कमी होता म्हणून किरकोळ जखमांवर निभावले. गेल्या काही वर्षात मांजा अडकून जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. डॉ. डी. सी. राजाप्पा पोलीस आयुक्त असताना त्यांनी मांजाविक्रीवर बंदी घातली होती. किराणा व स्टेशनरी दुकानात तपासणी करून मांजा जप्त करण्याची मोहीमच पोलिसांनी हाती घेतली होती. आता पतंगाचा मांजा डोकेदुखीचा ठरू लागला आहे.