चंदीगड / वृत्तसंस्था
आपल्या पत्नीचे फोन तिच्या नकळत रेकॉर्ड करणे हा पत्नीच्या खासगीत्वाच्या अधिकाराचा भंगच आहे, असा निर्णय पंजाब उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय देताना उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. पतीने पत्नीचे फोन संभाषण तिच्या अनुमतीशिवाय रेकॉर्ड केले होते आणि ते घटस्फोटाच्या प्रकरणात पुरावे म्हणून सादर केले होते. कौटुंबिक न्यायालयाने हे रेकॉर्डिंग पुरावे म्हणून सादर करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले होते. तेथे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द झाला.