प्रतिनिधी /बेळगाव
राज्य श्रमिक पत्रकार संघटनेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी दिलीप कुरुंदवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. इतर पदाधिकाऱयांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.
संघटनेच्या मानद अध्यक्षपदी भिमशी जारकीहोळी यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी पत्रकार राजशेखर पाटील, यल्लाप्पा तळवार, श्रीशैल मठद, सरचिटणीसपदी अरुण पाटील, श्रीकांत कुबकड्डी, सचिवपदी ईश्वर होटी, तानाजीराव मुरंबकर, खजिनदारपदी चेतन होळय़ाप्पगोळ, राज्य कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून मल्लिकार्जुन गोंदी यांची निवड झाली आहे. जिल्हा कार्यकारिणी समितीचे सदस्य म्हणून बसवराज होंगल, संजीवकुमार तिलगल, सुनील गावडे, सुरेश बाळोजी, राजेंद्र कोळी, रवि हुलकुंद, सुकुमार बन्नुरे, सिद्धलिंगय्या पुजेर, सूर्यकांत पाटील, राजकुमार बागलकोट, इरनगौडा पाटील, विक्रम पुजारी, भीमप्पा खिचडी, लीना टोपण्णावर, इरण्णा बुड्डागोळ यांची निवड झाली आहे.