साहित्य : 200 ग्रॅम पनीर, 3 कांदे, अर्धी वाटी वाटाणा पीठ, अर्धा चमचा लाल तिखटपूड, पाव चमचा हळदपूड, मीठ, पाव चमचा गरम मसालापूड, 1 चमचा आलं खिसून, दीड चमचा लसूण चिरून, पाव चमचा ओवा, तेल तळण्यासाठी, गेव्हीः अर्धी वाटी वाटाणा पीठ, अर्धा चमचा लाल तिखटपूड, पाव चमचा हळदपूड, मीठ, पाव चमचा गरम मसालापूड, 1 चमचा आलं खिसून, दीड चमचा लसूण चिरून, पाव चमचा ओवा, 2 कांदे पेस्ट बनवून, पाव चमचा आमचूर पावडर, 2 चमचे तेल
कृती : एक कांदा गोलाकार कापावा. दोन कांद्यांची पेस्ट बनवावी. पनीरचे चौकोनी तुकडे करावेत. बाऊलमध्ये कांदा पेस्ट, वाटाणा पीठ, हळदपूड, लाल तिखटपूड, गरम मसालापूड, ओवा, आलं, लसूण आणि थोडेसे पाणी घालून बॅटर बनवावे. त्यात पनीर मिक्स करून अर्धा तास ठेवावे. नंतर गरम तेलात सोनेरी रंगावर तळावे. उरलेल्या बॅटरमध्ये गोलाकार कापलेला कांदा मिक्स करून तळावा. ग्रेव्हीसाठी दिलेले साहित्य आणि पाणी मिक्स करावे. गरम तेलात आलं, लसूण आणि ओवा टाकावा. नंतर त्यात वाटाणा ग्रेव्ही मिक्स करून शिजवावे. वाटल्यास पाणी ओतावे. ग्रेव्ही शिजली की त्यात पनीर व कांदा मिक्स करावा. तयार पनीर ग्रेव्ही चपातीसोबत खाण्यास द्या.