एकसंबा नदीकाठी जनावरांचे स्थलांतर : पाणीपातळीत किंचित वाढ
वार्ताहर / एकसंबा
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने दूधगंगा नदीकाठी धास्ती कायम आहे. एकसंबा येथील दूधगंगा नदीकाठी असणाऱया शेतकऱयांनी खबरदारी म्हणून आपली जनावरे सुरक्षितस्थळी पोहचविण्यास सुरुवात केली आहे. गत दोन वर्षातील अनुभव लक्षात घेता दक्षता पाळण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे.
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पाणलोट क्षेत्रासह तालुक्मयात दमदार पाऊस बरसला. कोसळणारा पाऊस व नद्यांच्या पाणीपातळीत होणारी वाढ नदीकाठी धोक्मयाची चाहूलच होती. दूधगंगेने यापूर्वीच आपले पात्र सोडले असून नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेली आहे. तर शेकडो मोटार पंपसेटना जलसमाधी मिळाली आहे. एकसंबा येथील दूधगंगा नदीस जाणाऱया मुल्लानकी मार्गावरील नदीकाठच्या काही शेतकऱयांनी स्वतः सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनानेही त्यांचे कौतुक केले आहे.
तालुक्मयासह पाणलोट क्षेत्रात पाऊस जरी ओसरला असला तरी दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शनिवारी 535.610 मीटर असलेली पाणीपातळी रविवारी 535.790 मीटर इतकी होती. तर शनिवारी 27280 क्मयुसेकने असणारा विसर्ग रविवारी 28593 क्मयुसेकने होत होता. रविवारी 1313 क्मयुसेकने वाढ झाली आहे. तर कोयनेतून 2100, वारणेतून 1607, राधानगरीतून 1300 तर काळम्मावाडीतून 1200 क्मयुसेकने विसर्ग सुरू आहे. रविवारच्या विश्रांतीनंतर जर पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्यास आणखीन पाणीपातळीत वाढ होण्याची शक्मयता आहे. यामुळे नदीकाठी धास्ती वाढली आहे. पावसाचे प्रमाण पाहता यंदा जास्त पाऊस झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात यंदा 773 गतवषी 661 मि. मी., धोम पाणलोट क्षेत्रात यंदा 235 तर गतवषी 171 मि. मी., कण्हेर क्षेत्रात यंदा 310 तर गतवषी 147 मि. मी., वारणा क्षेत्रात यंदा 452 तर गतवषी 434 मि. मी., राधानगरी क्षेत्रात यंदा 864 तर गतवषी 864 मि. मी., काळम्मावाडी क्षेत्रात यंदा 719 तर गतवषी 766 मि. मी., महाबळेश्वर क्षेत्रात यंदा 972 तर गतवषी 653 मि. मी., नवजा पाणलोट क्षेत्रात यंदा 869 तर गतवषी 634 मि. मी. पाऊस झाला आहे.