ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या पंजाबमधील शेखूपुरा जिल्ह्यात शीख यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला रेल्वेची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात 19 शीख भाविक ठार झाले असून, 8 जखमी झाले आहेत. आज दुपारी ही घटना घडली.
शेखपुरा जिल्ह्यात ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणच्या रेल्वे क्रॉसिंगवर गेट नाही. त्यामुळे या क्रॉसिंगवरून 24 तास वाहनांची ये-जा सुरू असते. आज दुपारी अशीच वाहनांची वर्दळ असताना अचानक रेल्वे आल्याने रस्ता क्रॉस करणाऱ्या बसला रेल्वेची जोरदार धडक बसली. या धडकेत 19 जण जागीच ठार झाले तर 8 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.