ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दुबईत एका पाकिस्तानी नागरिकाने चोरीच्या उद्देशाने भारतीय दाम्पत्याची हत्या केली आहे. दुबईतील अरेबियन रँचेसमध्ये 18 जूनला ही घटना घडली. दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हिरेन अधिया आणि विधी अधिया असे हत्या करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिया दाम्पत्य दुबईतील अरेबियन रँचेसमध्ये राहत होते. हिरेन अधिया यांचाशारजा येथे व्यवसाय होता. तीन वर्षांपूर्वी हे जोडपे दुबईत स्थायिक झाले होते. 18 जून रोजी पाकिस्तानी नागरिकाने चोरीच्या उद्देशाने अधिया दाम्पत्याची हत्या केली. आरोपी पाकिस्तानी नागरिकांकडून दुबई पोलिसांनी चोरी केलेली ज्वेलरी जप्त केली आहे.