प्रतिनिधी/नागठाणे
पाडळी (ता.सातारा) येथील चोरट्या दारूविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून सुमारे १०,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिसांनी बाळकृष्ण महिपती भिसे (वय.५०, रा. पाडळी, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाडळी येथील मातंग वस्तीत संशयित बाळकृष्ण भिसे हा वृद्ध त्याच्या टिव्हीएस मोपेडच्या डिकीतून अवैधरित्या देशी दारू विक्री करत असल्याची माहिती सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हवालदार मनोहर सुर्वे, स्वप्नील माने, विजय साळुंख व विशाल जाधव यांनी पाडळी येथे छापा टाकला. यावेळी अवैध दारू विकताना त्यांनी बाळकृष्ण भिसे याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडून देशी दारूच्या बाटल्या, एक मोपेड दुचाकी असा सुमारे १०, ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद विजय साळुंखे यांनी दिली असून तपास हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.