पाळंदे समुदकिनारा दुर्घटना, ग्रामस्थांनी दिली माहिती,
वार्ताहर / मौजे दापोली
दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी शनिवारी बुडालेले बुडालेले दोन पर्यटक हे पाळंदे येथे समुद्रात चाळ असल्यामुळे बुडाले अशी माहिती ग्रामस्थ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान दोन्ही बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत
दापोली तालुक्यातील पाळंदे येथे समुद्रात महाड येथील आठ पर्यटक पोहण्यासाठी गेले होते तेथे समुद्रात उंच-सखलपणा आहे याला ग्रामीण भाषेमध्ये चाळ असे म्हणतात या चाळचा अंदाज न आल्याने आठही जण बुडत होते मात्र सहा जणांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आणि दोन जणांचा बुडून मृत्यू झाला.
रायगड जिह्यातील महाड येथील नवानगर मधील सुतार आळीतील दीपक सुतार प्रसंजीत तांबे, राजेश पवार, यश पवार, राहुल पवार, निखिल कोळंबेकर, सोहम सकपाळ व शिवम सोंडकर हे आठ मित्र मŸक्झिमो गाडी ने दापोलीत फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी ते पाळंदे समुद्रकिनारी आले. सकाळी तेथील एका ठिकाणी नाष्टा केला व त्यानंतर ते समुद्रात पोहायला गेले होते. शनिवारी अमावस्या असल्याने अमावस्येची ओहोटी होती. यावेळी पाण्याचा व ओहोटीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडायला लागले. उर्वरित 7 जणांपैकी सोहम सकपाळ व शिवम सोंडकर यांनी सर्वजण बुडत आहेत हे लक्षात आल्यावर वाळूच्या दिशेने पळ काढला त्यामुळे ते वाचले. त्याचबरोबर बाकीच्या युवकांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले मात्र दिपक सुतार व प्रसंजीत तांबे यांना वाचवण्यात अपयश आले.
त्यामुळे यात दीपक सुतार व प्रसंजीत तांबे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी दिपक सुतार याचा मृतदेह लगेच सापडून आला तर परंतु प्रसंजीत तांबे याचा मृतदेह सापडून आला नव्हता. त्यामुळे त्याचा शोध स्थानिक तरूण व पोलीस घेत होते. मात्र सायंकाळी 5 वाजता प्रसंजीत तांबेचा मृतदेह सापडून आला. या दोन्ही युवकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दापोली उपजिल्हा रूग्णालयात अधिक उपचार घेणारा यश पवार याची प्रकृती सुधारल्याने त्याला देखील घरी सोडण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत.