पुणे / प्रतिनिधी :
समीक्षक डॉ .प्रा. प्रभाकर देसाई यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.
कोल्हापूर-कागल काळम्मा येथील मूळचे असलेले डॉ. देसाई यांच्या या नियुक्तीने ज्येष्ठ लेखक डॉ.आनंद यादव यांच्या नंतर पुन्हा एकदा हे पद कागल तालुक्यातील कवी, समीक्षक प्रा.डॉ.देसाई यांच्याकडे आले आहे. डॉ. देसाई सध्या पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक आहेत.
देसाई यांची साहित्य समीक्षेवरील महत्वपूर्ण चार पुस्तके आणि पन्नासहून अधिक शोधनिबंधन प्रकाशित झाले आहेत. विविध नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात. या निवडीबद्दल डॉ.देसाई यांचे त्यांच्या मित्रमंडळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.