ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 35 हजार 538 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 58 हजार 98 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 20 हजार 803 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 755 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.17 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.02 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 942, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 174 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 21 , ग्रामीण क्षेत्रातील 59, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 28रुग्णांचा समावेश आहे. तसेच 500 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.84 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 87 हजार 787 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 82 हजार 846 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 941 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 24 हजार 55 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 58 हजार 98 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.