ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 31 हजार 31 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 600 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 25 हजार 732 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 15 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 420 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.71 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.14 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 88 हजार 313 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 84 हजार 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 153 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 52 हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 31 हजार 31 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.