मृतांचा आकडा 499 वर, पुणेकरांना धास्ती
ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 5 हजार 900 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 704 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 305 असून, विभागात आत्तापर्यंत 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 233 रुग्ण गंभीर असून, उर्वरित निरीक्षणाखाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिली.
पुणे जिल्ह्यात 8 हजार 303 बाधित रुग्ण असून, 4 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 10 आहे. कोरोनाबाधित एकूण 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 194 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 287 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 169, सातारा जिल्ह्यात 13, सोलापूर जिल्ह्यात 88, सांगली जिल्ह्यात 10, कोल्हापूर जिल्ह्यात 7 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
साताऱ्यात 569 कोरोनाबाधित रुग्ण असून, 230 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 322 आहे. कोरोनाबाधित एकूण 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1080 कोरोना बाधित रुग्ण असून 463 बाधितरुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 524 असून, एकूण 93 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगलीत कोरोनाबाधित 122 रुग्ण असून 68 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 50 आहे. 4 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 630 कोरोना बाधित रुग्ण असून 225 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ऍक्टीव रुग्ण संख्या 399 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुणेकरांची धास्ती वाढली
दरम्यान, पुण्यात मंगळवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाल्याने पुणेकरांची धास्ती वाढली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाने 6 ते 8 जणांचा मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. मात्र, हा आकडा मध्येच मोठ्या प्रमाणात वाढल्याने चिंता वाढली आहे.