ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी नव्या रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे आले. त्यातच पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 18, 242 इतकी आहे.
- नव्याने ‘इतक्या’ कोरोना बाधितांची भर
पुणे शहरात 316 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 79 हजार 732 इतकी झाली आहे.शहरातील 329 कोरोनाबाधितांना कालच्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. तर पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 68 हजार 337 झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात रविवारी एकाच दिवसात 5 हजार 734 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 26 लाख 93 हजार 608 इतकी झाली आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 783 रुग्णांपैकी 297 रुग्ण गंभीर तर 439 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 612 इतकी झाली आहे.
- कोविशिल्ड लस आज उपलब्ध नाही
पुण्यात आज (सोमवार) कोविशिल्ड लस सर्व सरकारी केंद्रावर बंद आसणार आहे. तर कोवॅक्सिनची सहा केंद्रे सुरु असून या केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध असणार आहेत, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.