सेन्सेक्स 372 अंकांनी घसरला : प्रमुख कंपन्या नुकसानीत
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय भांडवली बाजारात अखेर चौथे सत्रतही नुकसानीत राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने लार्सन ऍण्ड टुब्रो, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. याचा परिणाम म्हणून भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स 372 अंकांच्या नुकसानीसह बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये दिवसअखेर 372.32 अंकांनी घसरुन निर्देशांक 59,636.01 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 133.85 अंकांनी घसरत 17,764.80 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा स्टील आणि इंडसइंड बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला मुख्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग वाढीसह बंद झाले आहेत.
पेटीएमचे लिस्टिंग
गुरुवारच्या सत्रात दोन कंपन्यांचे समभाग लिस्ट झाले आहेत. यामध्ये पेटीएम कंपनीचे समभाग नुकसानीत राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजीचा सूर राहिला होता. यामुळे कंपनीच्या समभागात कोणत्याही प्रकारची सुधारणात्मक स्थिती पहावयास मिळाली नाही.
गुंतवणूकदार नाराज
पेटीएमचा आयपीओ खरेदीलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता तसेच गुरुवारी लिस्टिंगच्या दरम्यानही समभागात म्हणावी तशी कामगिरी करता न आल्याने गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातवारण राहिल्याचे दिसून आले. याचा प्रभाव म्हणून भारतीय बाजारात घसरणीची स्थिती होती.
देशातील बाजाराच्या स्थितीसह जागातिक बाजारांपैकी आशियातील बाजारात नकारात्मक संकेत राहिल्याने बाजारत दबाव होता. यामुळे आशियातील शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेग, जपानचा निक्की व दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नुकसानीसह बंद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.46 टक्क्यांनी घसरुन 79.91 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- स्टेट बँक……… 503
- पॉवरग्रिड कॉर्प 192
- एचडीएफसी बँक 1539
- रिलायन्स इंडस्ट्रीज 2472
- आयसीआयसीआय 763
- हिंदुस्थान युनि 2397
- डिव्हीस लॅब. 4789
- डाबर इंडिया.. 607
- आयओसी……. 129
समभाग घसरलेल्या कंपन्या
- महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 923
- टेक महिंद्रा… 1566
- एचसीएल टेक 1120
- लार्सन ऍण्ड टुब्रो 1898
- टाटा स्टील… 1186
- इंडसइंड बँक. 1008
- मारुती सुझुकी 8112
- बजाज फिनसर्व्ह 17912
- बजाज फायनान्स 7465
- डॉ.रेड्डीज लॅब 4695
- टीसीएस…… 3475
- कोटक महिंद्रा 2025
- अल्ट्राटेक सिमेंट 7770
- बजाज ऑटो.. 3550
- एनटीपीसी….. 135
- आयटीसी……. 237
- भारती एअरटेल 714
- ऍक्सिस बँक…. 706
- टायटन…….. 2479
- नेस्ले………. 19334
- एचडीएफसी. 2930
- इन्फोन्सिस… 1780
- सन फार्मा…… 789
- एशियन पेन्ट्स 3226
- वेदान्ता………. 309
- टाटा पॉवर….. 236
- अशोक लेलँड… 139
- अरोबिंदो फार्मा 639
- ज्युबिलंट फूड 3805
- आयशर मोर्ट्स 2599
- मदरसन सुमी.. 237
- बायोकॉन 366