मोपा भूपीडितांचा सरकारला इशारा, टॅक्सी व्यवसायिकांचे एकजुटीचे संकेत
प्रतिनिधी /पेडणे
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहुर्त अखेर ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 8 डिसेंबर 2022 रोजी उद्घाटन होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मोपा भूपीडितांची रखडलेली भरपाई, विमानतळावर स्थानिकांना रोजगारात संधी, व्यवसायात प्राधान्य आदी घोषणा सध्या हवेतच विरल्या आहेत. पेडणेकरांना चुना लावून मोकळे होण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारची घोड चूक, असा इशारा भूपीडित आणि स्थानिकांनी दिला आहे. मोपा विमानतळावरील टॅक्सी व्यवसायात भूपिडितांना प्राधान्य तसेच तालुक्मयातील इतरांनाही संधी मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी पेडणे मतदारसंघातील तिन्ही टॅक्सी संघटनांनी एकत्रितपणे समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे.
चांदेल- हंसापूरचे सरपंच तुळशीदास गांवस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी तिन्ही टॅक्सी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱयांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला उगवे- तांबोसे, मोपचे सरपंच सुबोध महाले, भास्कर नारूलकर तसेच पेडणेचे पत्रकार किशोर नाईक गांवकर हजर होते. मोपा विमानतळामुळे तयार होणाऱया वेगवेगळय़ा रोजगार आणि व्यवसायसंधीचा उपयोग पेडणेकरांना कसा काय मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज या बैठकीत व्यक्त झाली. मोपा विमानतळामुळे अन्याय झालेल्या विविध घटकांना अद्यापही न्याय मिळाला नाही. या न्यायासाठी केवळ तक्रारी आणि विरोध करण्यात व्यस्त राहिलेल्या पेडणेकरांना चुना लावण्याचे प्रयत्न जीएमआर कंपनी आणि सरकारकडून सुरू आहेत. स्थानिक असंघटित घटकांना सरकारने योग्य मार्गदर्शन करण्याची गरज होती, परंतु तसे न घडता या संपूर्ण प्रक्रियेत पेडणेवासियांच्या डोळय़ांत धुळफेक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा सुरू या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
टॅक्सी संघटनांची एकजूट
पेडणे मतदारसंघात तीन टॅक्सी संघटना सध्या कार्यरत आहेत. यापैकी एक संघटना मोपा विमानतळावरील व्यवसायात भूपीडितांना प्राधान्य मिळावे, यासाठी प्रयत्नरत आहेत. दुसऱया दोन संघटना भूपिडितांसह पेडणे मतदारसंघातील टॅक्सी व्यवसायिकांनाही संधी मिळायला हवी, या विचारांच्या आहेत. या तिन्ही संघटनांना एकत्र आणून एकजुटीने सगळय़ांसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार रविवारच्या बैठकीत घेण्यात आला. पेडणेवासियांची फसवणूक करण्याचा प्रयत्न जीएमआर पंपनी व सरकारकडून होत आहे, असा आरोप करत नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पेडणेच्या संवर्धनासाठी एकत्रित लढा हवा
केवळ रोजगार, व्यवसायसंधी या पलिकडे पेडणे तालुक्मयाचे अस्तित्वच मोपा विमानतळामुळे धोक्मयात येणार आहे. पाणी, वीज, पर्यावरण आदींसोबतच मोठय़ा प्रमाणात स्थालांतरितांचे लोंढे तालुक्मयाकडे वळणार आहेत. पेडणेत झुवारीनगरसारखी एकही झोपडपट्टी तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल,अन्यथा पेडणेची कधी धारावी होईल, हे देखील कळणार नाही, अशी खंत अनेकांनी या बैठकीत बोलताना व्यक्त केली.