नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने कर्ज उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. येणाऱया काळामध्ये पॉवर फायनान्स कंपनी 82 हजार कोटी रुपये कर्ज उभारणार आहे. कंपनीने या संदर्भातली माहिती सोमवारी शेअर बाजाराला दिली. 28 फेब्रुवारीला संचालक मंडळाची बैठक झाली होती. त्यात 2022-23 या वर्षाकरीता 82 हजार कोटी रुपये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली.