वृत्तसंस्था/ लंडन
फिफाच्या आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्रता फेरीतील तुर्कीविरूद्ध होणाऱया सामन्याला पोर्तुगालचा फुटबॉलपटू रूबेन डायस दुखापतीमुळे उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. दुखापतीमुळे तो किमान 6 महिने खेळू शकणार नाही, असे मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबच्या व्यवस्थापकाने यापूर्वी म्हटले होते. 2016 साली युरोपियन फुटबॉल स्पर्धेतील चॅम्पियन्स पोर्तुगालचा पात्र फेरीचा सामना तुर्कीविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. एफए फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटी संघाकडून खेळताना डायसला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे डायसला किमान सहा आठवडे फुटबॉल क्षेत्रापासून अलिप्त रहावे लागणार आहे. मंगळवारच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने पीटर्सबॉरोचा 2-0 असा पराभव केला.