प्रसिद्ध पार्श्वगायक म्हणून परिचित असर्णऱया शाहिद मल्ल्या याचं नवीन गीत लवकरचं रसिकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदने आता पर्यंत अनेक सुमधुर गीते गायली असून हिंदी बरोबरचं पंजाबी गीते तो गातो.
सारी कसर दिल की…तुझपे निकाल दू असे या गीताचे बोल आहेत. आगामी पुणे टू गोवा या चित्रपटाचे अमोल भगत दिग्दर्शन करत असून या हिंदी चित्रपटाची निर्मिती आदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आणि मोरया प्रॉडक्शन हाऊस यांनी केली आहे. हा चित्रपट कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर, आणि ऍक्शन रसिकांना पाहता येणार आहे. या गीताला संगीत दिग्दर्शक सन्मित वाघमारे यांनी दिले आहे, व्यवस्था अमोम इनामदार आणि शब्द रॉपर ब्रॉज ने लिहीले आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये आदित्यराजे मराठे आणि प्रह्लाद रामभाऊ तावरे यांचा समावेश आहे. तर सह निर्माते नव निसर्ग प्रॉडक्शन किशोर खरात आहेत. वास्तविक हा चित्रपट वास्तविक आयुष्यात संघर्ष करणाऱया कलाकारांच्या पुणे ते गोव्याच्या प्रवासावर आधारित आहे, पण या कथेतून अनेक रोमांचक अनुभव, रहस्यमय घटना आणि प्रवासादरम्यान येणाघ्&या धोकादायक परिस्थितींवर प्रकाश टाकण्यात आला आहे.