वृत्तसंस्था/ पॅरिस
2020 सालातील प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा कोरोना महामारी संकटामुळे लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. सदर स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये घेण्याची घोषणा करण्यात आली होती. आता या स्पर्धेवेळी रोलॉ गॅरोच्या स्टेडियमवर नेहमीच्या क्षमतेपैकी 60 टक्के शौकिनांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा नियमित वेळापत्रकाप्रमाणे मे महिन्यात घेतली जात असे. पण कोरोना समस्येमुळे ती सप्टेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला होता. ऑगस्टमध्ये न्यूयॉर्क येथे अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा संपल्यानंतर प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा सप्टेंबरच्या 27 तारखेला घेतली जाईल, अशी माहिती प्रेंच टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष बर्नार्ड ग्युडेसिली यांनी दिली आहे. प्रेंच ग्रग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी टेनिस स्टेडियमची क्षमता सुमारे 20 हजार प्रेक्षकांची आहे. पण यावेळी सुमारे 10 हजार प्रेक्षकांना अधिकृत परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले. फ्रान्समध्ये कोरोना महामारीने सुमारे 11 लाख लोकांना लागण झाली असून आतापर्यंत 5 लाख लोकांचे बळी घेतले आहेत.