बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे बाजारात पावसाळी ताडपत्रींच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात विपेत्यांनी विविध रंगांमध्ये, आकारामध्ये प्लास्टिक ताडपत्र्या उपलब्ध केल्या आहेत. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी, मालवाहू वाहनधारक, हमाल, फेरीवाले, लहान दुकानदारांकडून मागणी वाढली आहे. जोरदार पावसामुळे बाजारपेठेत वेगवेगळय़ा प्रकारचे प्लास्टिक खरेदी करताना नागरिक दिसत आहेत.
पावसाळय़ात चारा खराब होऊ नये यासाठी गवतगंजीवर व झोपडपट्टीसाठी प्लास्टिक ताडपत्रींचा वापर केला जातो. मालवाहू ट्रक, टेम्पो, रिक्षा, टॅक्टर आदी वाहनांवर झाकण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. मात्र, कोरोनामुळे मुबलक प्रमाणात प्लास्टिक माल येत नसल्याचे विपेत्यांनी सांगितले. दुचाकींवर झाकण्यासाठी विविध प्रकारच्या कव्हरचा वापर केला जातो. त्यामुळे त्यांची दुचाकीधारकांकडून मागणी वाढली आहे. पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मान्सूनपूर्वीच प्लास्टिकची खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. त्यामुळे बाजारात प्लास्टिक कागद व ताडपत्री खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
यावषी लॉकडाऊनमुळे प्लास्टिकच्या किमतीत वाढ झाली असल्याचे विपेत्यांनी सांगितले. सध्या बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या 18 बाय 12 आकाराच्या ताडपत्रीचा दर 600 रुपये, 18 बाय 15 आकाराची ताडपत्री 700 रुपये, 12 बाय 15 आकाराची ताडपत्री 500 रुपये तर 18 बाय 24 आकाराची ताडपत्री 900 रुपये तर 18 बाय 30 आकाराची ताडपत्री 1100 रु., 9 बाय 12 आकाराच्या ताडपत्रीचा दर 300 रुपये आहे. दुचाकीसाठी वापरण्यात येणाऱया कव्हरचे दर 250 ते 500 रुपयांपर्यंत आहेत. शेतकऱयांसाठी असलेल्या खोळ प्लास्टिकचा दर 10 ते 50 रुपये मीटरपर्यंत आहे. गवतगंजीसाठी वापरण्यात येणाऱया प्लास्टिकचा दर 30, 40, 50 रुपये मीटर आहे.