वृत्तसंस्था/ कतार
भारतीय फुटबॉल संघातील मध्यफळीत खेळणारा फुटबॉलपटू अनिरूद्ध थापाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याला डोहाच्या एका हॉटेलात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
भारतीय फुटबॉल संघ सध्या कतारच्या दौऱयावर आहे. फिफाच्या विश्वचषक आणि एएफसी आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघ खेळत आहे. भारत आणि कतार यांच्यातील पात्र फेरीचा सामना गुरूवारी खेळविण्यात आला होता आणि हा सामना भारताला 0-1 असा गमवावा लागला. या सामन्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे बुधवारी अनिरूद्ध थापाची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर त्याला डोहाच्या हॉटेलमधील एका स्वतंत्र खोलीत आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस कुशल दास यांनी दिली आहे थापाने आतापर्यंत किमान 20 सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.