वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन वाहन कंपनी फोर्ड मोटारने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार कंपनी भारतामधील कोरोनाच्या दुसऱया लाटेला थोपविण्यासाठी मदत करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. या कोरोना लढाईच्या विरोधात कंपनी 50 लाख सर्जिकल मास्क आणि एक लाख एन95 मास्क आणि 50 हजार कोरोना किट दान देणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
भारत या दिवसांमध्ये कोरोनाच्या गंभीर लाटेशी लढा देत आहे. या संक्रमणाच्या प्रभावामुळे मागील 24 तासात देशात उच्चांकी रुग्णवाढ झाली असल्यामुळे चिंताजनक स्थिती राहिली असून देशातील विविध क्षेत्रातील उद्योग मदत करण्यासाठी पुढे येत असल्याचे वातावरण पहावयास मिळत आहे.
भारत-ब्राझीलसाठी देणार अनुदान
अधिकच्या माहितीनुसार फोर्ड भारत आणि ब्राझीलमधील कोरोना संकटाला थोपविण्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध करण्यासाठीच्या संघटनांना दोन लाख डॉलरचा निधी देणार असल्याचे ट्वीट करुन सांगितले आहे.