ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्समध्ये एका मायक्रोलाईट विमानाने हवेत प्रवासी विमानाला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू झाला. दक्षिण फ्रान्समधील आग्रेय शहरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सेगैर म्हणाल्या, मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते. त्या विमानाने शनिवारी संध्याकाळी DA40 या प्रवासी विमानाला हवेतच समोरासमोर जोरदार धडक दिली. या प्रवासी विमानात तीन जण होते. या भीषण अपघातात दोन्ही विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघातस्थळी बचावकार्यासाठी 50 अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि 30 पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. विमानाच्या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.