परिवहनचे अक्षम्य दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय : प्राथमिक सुविधांअभावी प्रवाशांचे हाल
प्रतिनिधी / बेळगाव
सतत हजारो प्रवाशांनी गजबजणाऱया मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात पाण्याची डबकी निर्माण झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे स्मार्ट सिटीअंतर्गत बसस्थानक उभारण्यात येत आहे. दुसरीकडे बसस्थानकात सुविधांपेक्षा असुविधांचाच सामना प्रवाशांना करावा लागत आहे. बसस्थानकात निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
जागोजागी पडलेली डबकी, आवारातील रस्त्यांची दुर्दशा, शौचालयांची अस्वच्छता, आसन व्यवस्थेची कमतरता अशा अनेक समस्यांनी बसस्थानकाला ग्रासले आहे. त्यातच पावसामुळे परिसरात पाण्याची डबकी निर्माण झाल्याने बसस्थानक डबक्मयांचे आगार बनले आहे.
बसस्थानकातील आवारात जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणी साचून परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रवाशांना यातूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनामुळे परिवहन मंडळाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे प्रवाशांना बसस्थानकात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आवारात पुरुष व महिलांसाठी शौचालयांची उभारणी पेली आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याच सुविधा पुरविल्या नसल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. परिणामी प्रवाशांना नाक मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे प्राथमिक सुविधांअभावी हाल होताना दिसत आहेत. परिवहनने याची दखल घेऊन बसस्थानकात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.