वृत्तसंस्था/ ढाक्का
चालू महिनाअखेरीस बांगलादेश-पाकिस्तान यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका बांगलादेशमध्ये खेळविली जाणार आहे. बांगलादेशचा सलामीचा फलंदाज तमिम इक्बालला दुखापतीमुळे ही मालिका हुकणार आहे.
बांगलादेश संघातील सलामीचा फलंदाज तमिम इक्बालला अंगठय़ाची दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे त्याने सदर कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. पाक-बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी चित्तगाँवमध्ये 26 नोव्हेंबरपासून तर दुसरी कसोटी 4 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे. पाकचा टी-20 संघ शनिवारी ढाक्यात दाखल झाला आहे. उभय संघातील टी-20 मालिकेला 19 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. पाक संघ बांगलादेशच्या दौऱयात दोन कसोटी आणि टी-20 सामने खेळणार आहे.
पाकचा टी-20 संघ- बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, असिफ अली, फक्र झमान, हॅरिस रौफ, हैदर अली, हसन अली, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम, खुशदील शहा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम (ज्युनियर), सर्फराज अहमद, शाहिन आफ्रिदी, शहनवाज, शोएब मलिक व उस्मान कादीर.