ऑनलाईन टीम / कोलकाता :
काही दिवसांपूर्वीच भाजपातून बाहेर पडून राजकीय निवृत्तीची घोषणा करणारे माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
केंद्रीय मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार डेरेक ओब्रायन देखील उपस्थित होते. यावेळी भाजपातील अनेक नेते नाराज असून, ते तृणमूलच्या संपर्कात आहेत. आज बाबुल सुप्रियो आले. उद्या दुसरे येतील, ही प्रक्रिया सुरूच राहील, असे कुणाल घोष यांनी म्हटले आहे.