वृत्त संस्था/ बार्सिलोना
स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रातील अव्वल फुटबॉल क्लब म्हणून ओळखल्या जाणाऱया बार्सिलोना क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी झेव्ही हर्नांडेझची नियुक्ती करण्यात आली आहे.
बार्सिलोना क्लब आणि हर्नांडेझ यांच्यात नुकताच नवा करार झाला असून 2021 च्या उर्वरित फुटबॉल हंगामासाठी तसेच आगामी दोन वर्षांच्या कालावधीसाठी हर्नांडेझकडे प्रशिक्षकपदाची धुरा असेल, अशी घोषणा क्लबच्या व्यवस्थापकानी केली. झेव्ही हर्नांडेझने आपल्या 17 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत बार्सिलोना क्लबकडून 767 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. 1998 ते 2015 या कालावधीत हर्नांडेझने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर बार्सिलोना क्लबला 25 प्रमुख स्पर्धा जिंकून दिल्या आहेत.