विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे / प्रतिनिधी:
बावळाट गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतन देवस्थांनचा २९ वा वाढदिवस शुक्रवारी ११ मार्च रोजी होत असून यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम दुपारी आरती त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद त्यानंतर सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री १२ वाजता बावळाट येथील श्री देवी सातेरी माऊली दशावतार मंडळाचा अंबादर्शन हा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.