नूतन सदस्यांनी दिली ‘तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट
वार्ताहर / किणये
बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत रुकय्या मेहबूब नावगेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया बुधवारी झाली. निवडणूक अधिकारी म्हणून एन. एस. कांबळे यांनी काम पाहिले.
बिजगर्णी ग्राम पंचायतीच्या उपाध्यक्षा हसीनाबी असिफ नावगेकर यांचे निधन झाले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ग्राम पंचायतीमध्ये एक जागा रिक्त होती. या रिक्त जागेसाठी बुधवारी निवडणूक होती. केवळ रुकय्या नावगेकर यांचा एकच अर्ज आला असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. बिजगर्णी ग्रा. पं. मध्ये एकूण 14 सदस्य
आहेत.
नूतन सदस्या रुकय्या मेहबूब नावगेकर यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन ‘तरुण भारत’चे संस्थापक स्व. बाबुराव ठाकुर यांच्या फोटोप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा बेळगावकर, मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, मारुती जाधव, यशवंत जाधव, संतोष कांबळे, मनोहर पाटील, रसूल नावगेकर, परशराम सुतार, अब्दुल नावगेकर, सत्याप्पा पाटील, गितेश ठाणब आदी उपस्थित होते.