प्रतिनिधी /बेळगाव
बिम्स हॉस्पिटलला सीआयआय संघटनेच्या उद्योजकांनी 15 लाख 85 हजार रुपयांची मदत केली. कोविड-19 च्या गंभीर परिस्थितीमुळे व बिम्समध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. बिम्सचे कामकाज सुधारण्यासाठी सरकारने प्रादेशिक आयुक्त अमलान बिस्वास यांची नियुक्ती केली. त्यांनी बिम्सच्या विकासासाठी जनतेने सहकार्य करावे व आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले होते. त्यानुसार उद्योजकांनी हा निधी सुपूर्द केला.
ही मदत पुढीलप्रमाणे…
जयभारत फौंडेशन व नेतलकर इंजिनिअEिरग प्रत्येकी 5 लाख रु., शांती फौमॅक 2 लाख रु., स्नेहम फौंडेशन व व्हेगा ऑटो ऍक्सेसरिज प्रत्येकी 1 लाख रु., रेकफ्लो टेक्नॉलॉजी, ओरियन हैड्रोलिक्स व बेलगाम फेरोकास्ट इंडिया लि. प्रत्येकी 50 हजार रु., सर्व्हो कंट्रोल एरोस्पेस इंडिया प्रा. लि. 25 हजार रु., एक्स्पर्ट इंजिनिअरिंग 10 हजार रु.. सीआयआय बेळगावचे चेअरमन व व्हेगाचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चिंडक, व्हा. चेअरमन व स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिश मेत्राणी, अशोक आयर्न ग्रूपचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी, ओरिऑनचे क्रीस्टोफ व मिलिसा मिचॅडो यांनी अमलान बिस्वास यांच्याकडे सदर रकमेचे धनादेश सुपूर्द केले.