प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रीमियर लीग सहाव्या आवृत्तीचे मुख्य पुरस्कर्ते म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे लाभले आहेत.
ग्रामीण भागातील एक अग्रेसर व नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य व माजी शिक्षण स्थायी समिती अध्यक्ष, मोहन मोरे फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन मोरे युनियन जिमखानावर होणाऱया बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी मुख्य पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत.
सामाजिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱया व क्रीडा क्षेत्रातही आपले योगदान देणाऱया मोहन मोरे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. याआधीही एक संघमालक म्हणून बेळगाव प्रीमियर लीग स्पर्धेत त्यांनी सहभाग दर्शविला होता. ते आता या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते बनले
आहेत.
युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ट क्रिकेटपटू शंकर खासनीस मुंबई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मोहन मोरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्योगपती एसएम चौगुले, युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, संचालक सुहास कुलकर्णी, संजय मोरे व प्रशांत खासनीस उपस्थित होते. बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होणार असून एकूण आठ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने होणार आहेत