प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील 135 पोलीस व अधिकाऱयांना मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. 2021 सालासाठीच्या सुवर्ण पदकांसाठी बेळगाव येथील सहाहून अधिक अधिकारी व पोलिसांना सुवर्णपदक जाहीर झाले आहे.
हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, एसीबीचे (ऍन्टीकरप्शन ब्युरो) पोलीस निरीक्षक यु. एस. गुदीगोप, वाहतूक उत्तर विभागाचे व सध्या तांत्रिक विभागात सेवा बजाविणारे हवालदार दीपक माळवदे, राज्य गुप्तचर विभागाचे सिनीअर इंटेलिजन्स असिस्टन्ट राजेंद्र बडेसगोळ, डीएआर विभागाचे एआरएसआय महादेव कोटीवाले, राज्य राखीव दलाचे आरएसआय यल्लाप्पा बजंत्री यांना मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. निपाणी शहर पोलीस स्थानकातील सचिन पाटील यांचाही या यादीत समावेश असून मार्केट पोलीस स्थानकाचे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी यांनाही मुख्यमंत्र्यांचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. 2 एप्रिल रोजी पोलीस ध्वजदिन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदकांचे वितरण केले जाणार आहे.