दोन कारमधून आलेल्या दरोडेखोरांचे कृत्य : म्हैसूरला जाताना घडली घटना
प्रतिनिधी / बेळगाव
कामानिमित्त बेळगावहून म्हैसूरला जाणाऱया सराफाला मंडय़ा जिल्हय़ातील बळघट्ट (ता. पांडवपूर) जवळ लुटण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दोन कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी सराफाच्या कारवर हल्ला करून कारमधील रोकड पळविल्याची घटना घडली आहे.
यासंबंधी पांडवपूर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. बळघट्ट गावकऱयांनी पाठलाग करून दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरोडेखोरांनी 1 लाख 10 हजार रुपये रोकड असलेली बॅग पळविल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले असले तरी ही रक्कम मोठी असल्याचे समजते.
बेळगाव येथील बालाजी जाधव (वय 35) व सिराज हे दोघे कारमधून म्हैसूरला जात होते. त्यावेळी दोन कारमधून आलेल्या बारा दरोडेखोरांनी बळघट्टजवळ सराफाची कार अडविली. त्यावेळी सकाळचे 6 वाजले होते. सुरुवातीला कोयते, तलवारी, रॉडने हल्ला करण्यात आला. त्यानंतर पैशाची बॅग पळविण्यात आली.
हल्ल्यात किरकोळ जखमी झालेल्या सराफ व त्यांच्या सहकाऱयांनी आरडाओरड करताच गावकऱयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
त्यावेळी दरोडेखोरांपैकी एकाने गावकऱयांवरही पिस्तुल रोखले. मोठय़ा धाडसाने या टोळीतील दोघांना पकडून पांडवपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घटनेची माहिती समजताच पांडवपूरचे पोलीस निरीक्षक विवेकानंद व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिकांकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. ‘तरुण भारत’ने गुरुवारी सायंकाळी पांडवपूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यात कारमधील कोणालाही गंभीर इजा पोहोचली नसल्याचेही पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.