पोस्ट खात्याच्या फिलाटेली प्रदर्शनाचे उद्घाटन
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्यपूर्व काळात व प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतलेल्या शूरवीरांची माहिती आजच्या पिढीला समजावी या उद्देशाने पोस्ट खात्यातर्फे दोन नव्या लिफाफ्यांचे अनावरण करण्यात आले. बैलहोंगल तालुक्मयातील बेळवडी मल्लम्मा व स्वातंत्र्यसैनिक कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांच्या प्रतिमा असणाऱया लिफाफ्यांचे सोमवारी अनावरण करण्यात आले. याचबरोबर तीर्थक्षेत्र सौंदत्ती यल्लम्मा पोस्ट कार्यालयाला कायमस्वरूपी स्टॅम्प देण्यात आला.
बेळगाव पोस्ट विभागाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावषी फिलाटेली प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावषी हे प्रदर्शन ऑनलाईन स्वरुपात आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवबसवनगर येथील एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिटय़ूटच्या सभागृहात सोमवारी झाले. धारवाड येथील पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदकुमार व कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के. आनंद यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन व लिफाफ्यांचे अनावरण करण्यात आले.
डॉ. विनोदकुमार म्हणाले, पोस्टमन एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीकडे केवळ पत्रच देत नाही तर त्याच्यासोबत त्यांच्या भावनाही पोहोचवितो. छंदामधून अनेकांनी फिलाटेली संग्रह केला आहे. ज्या स्वातंत्र्यसैनिक व शूरवीरांचा इतिहास सर्वांसमोर आला नाही तो इतिहास सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न पोस्ट खाते लिफाफे व पोस्टकार्डमधून करीत असल्याचे त्यांनी सांगितले. के. आनंद यांनी पोस्ट खात्याचे अभिनंदन केले.
बेळवडी मल्लम्मा ट्रस्टचे चंद्रशेखर करीमर्डी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व बेळवडी मल्लम्मा यांच्यातील नाते सांगितले. गंगाधर देशपांडे यांच्या नात अनिता मांडलेकर यांनी गंगाधररावांच्या कार्याचा आढावा घेतला. पोस्ट खात्याने यल्लम्मा देवस्थानच्या नावे स्टॅम्प तयार केल्याबद्दल ट्रस्टचे सदस्य बसय्या हिरेमठ यांनी आभार मानले. बेळगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक एस. विजय नरसिम्हा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. एम. के. कोत्तल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोस्टमास्तर सी. एम. केरीमठ, बी. पी. माळगी, जी. बी. नाईक, पी. एस. कलपत्री, यासह पोस्ट खात्याचे सदस्य उपस्थित होते.