ऑनलाईन टीम / अबूजा :
नायजेरियात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी शेतात काम करणाऱ्या 43 मजुरांची निघृण हत्या केली. नायजेरियाच्या उत्तर-पूर्व भागातील मैदुगुरी शहरात शनिवारी ही घटना घडली. मिलिशिया नेता बाबाकुरा कोलो यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दहशतवाद्यांनी मारलेले सर्व शेतमजूर उत्तर पश्चिम नायजेरियाच्या सोकोतो राज्यातील होते. हे सर्वजण कामाच्या शोधात मैदुगुरी शहरात आले होते. दहशतवाद्यांनी या सर्वांना रस्सीने बांधले. त्यानंतर जबरी मारहाण करत त्यांचे गळे कापले.
बोको हरामच्या हल्ल्यात 43 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर सहा लोक जखमी आहेत. आठ लोक अद्याप बेपत्ता असून, दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येते.