ऍड. प्रशांत चिटणीस यांची माहिती
कोल्हापूर /प्रतिनिधी
मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी घोटाळा केल्याचा आरोप करत ईडीकडे तक्रार करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायायलातील सहावे सह दिवाणी स्तर न्यायाधीश पी. आर. राणे यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांचे वकील ऍड. प्रशांत चिटणीस यांनी दिली. याची पुढील सुनावणी शुक्रवार 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे.