ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारतानंतर आता अमेरिकेनेही चीनला झटका देत टिक टॉक, वी चॅट या चिनी ॲपवर बंदी घातली आहे. याआधी भारताने देखील 224 चिनी ॲप वर बंदी आणली आहे, या निर्णयाचे अमेरिका प्रशासनाने स्वागत केले होते. आता अमेरिकेने देखील राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत टिक टॉक, वी चॅट ॲपवर बंदी घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 20 सप्टेंबरपासून वी चॅट आणि 12 नोव्हेंबरपासून टिक टॉक चालणार नाही. ज्या मोबाईलमध्ये हे ॲप सुरू आहेत, त्यातही कंटेंट डिलीव्हरी नेटवर्कर बंदी असल्याने ते वापरता येणार नाहीत.
गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी टिक टॉक आणि वी चॅटवर बंदी घालण्यासाठी एका आदेशावर सह्या केल्या होत्या. या अंतर्गत दोन्ही कंपन्या त्यांची मालकी अमेरिकन कंपन्यांना विकू शकतात. मात्र टिक टॉक ने मायक्रोसॉफ्टला विक्री करण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेचे मंत्री विल्बर रॉस यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरून आम्ही अमेरिकन नागरिकांची माहिती गोळा करण्याच्या चीनच चुकीच्या कामाला थांबवण्यासाठी आम्ही मोठी कारवाई करत त्यावर बंदी घातली आहे. जर टिक टॉक मध्ये काही उपाय योजना केल्या गेल्या तरच त्याचा वापर शक्य आहे, अन्यथा नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना चीन म्हणाले की, चीन त्यांना त्रास देत आहे. तसेच चीनने धमकी देणे सोडावे. तसेच चुकीची कामे बंद करून प्रामाणिक आणि पारदर्शक आंतरराष्ट्रीय नियम आणि व्यवस्था कायम ठेवण्याची विनंती देखील यावेळी चीनकडून करण्यात आली.